निलम संखे यांची बोईसर ग्रामपंचायत प्रभारी सरपंचपदी नियुक्ती

   

बोईसर ! शिवसेना (शिंदे गट) उपजिल्हाप्रमुख निलम संखे यांची बोईसर ग्रामपंचायतीच्या प्रभारी सरपंचपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सरपंच दिलीप धोडी वैद्यकीय कारणास्तव रजेवर गेल्यामुळे ही जबाबदारी संखे यांच्यावर सोपवण्यात आली.

     निलम संखे यांचा सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. २००१ साली बोईसर शहर प्रमुख पदाची जबाबदारी स्वीकारून त्यांनी तब्बल १५ वर्षे सेवा दिली. त्यानंतर २०१५ मध्ये पालघर तालुका प्रमुखपद आणि २०१६ मध्ये बोईसर विधानसभा संघटकपदही समर्थपणे सांभाळले. २०२२ मध्ये उपजिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली असून त्या वेळेपासून त्यांनी पक्षसंघटनेच्या मजबुतीसाठी कार्य सुरू ठेवले आहे.

     २०११ ते २०१६ या काळात त्यांनी बोईसर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाची जबाबदारी पार पाडली असून २०२२ च्या निवडणुकीत ते बिनविरोध उपसरपंचपदी निवडून आले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली इतर सदस्यांनीही निवडणुकीत यश मिळवले.

     २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर ८५ बूथचे नेतृत्व सोपवले होते. त्यांच्या प्रभावी नेतृत्वामुळे शिवसेना उमेदवार विलास तरे यांना तब्बल ४४,४५५ मतांनी विजय मिळवता आला, त्यापैकी २१,१६४ मतांची आघाडी संखे यांच्या बूथमधूनच मिळाली.

     निलम संखे यांनी सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केले आहे. ते शिव सम्राट प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष असून, मोफत रुग्णवाहिका सेवा, रक्तदान शिबिरे, वह्या वाटप आणि विविध सामाजिक उपक्रम यशस्वीरित्या राबवले आहेत. तसेच, ते शिव सम्राट ऑटो रिक्षा-टेम्पो चालक-मालक संघटनेच्या संस्थापकही आहेत. रेल्वे कमिटी सदस्य आणि पालघर जिल्हा नियोजन समिती सदस्य म्हणूनही त्यांनी योगदान दिले आहे.

     बोईसरच्या सर्वांगीण विकासासाठी झटणाऱ्या निलम संखे यांनी आपले संपूर्ण आयुष्य सामाजिक व राजकीय कार्यासाठी समर्पित केले असून, त्यांची प्रभारी सरपंचपदी निवड स्थानिक स्तरावर स्वागतार्ह ठरत आहे.

    Post Views:  299

मुख्य संपादक

Card image

संतोष मधुकर घरत

आत्मासाई -2, फ्लॅट नंबर 2, D विंग काटकर पाडा बोईसर, ता. जि. पालघर. पिन 401501

Phone: 9766554999